E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये लष्कर मदती ऐवजी एअरस्ट्राइक
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
नेपीडा : भूकंपामुळे हादरलेल्या म्यानमारमध्ये त्यांच्या लष्कराने अतिशय निर्घृण कृत्य केले. लष्कराने भूकंपप्रवण क्षेत्रात एअरस्ट्राइक आणि ड्रोनहल्ले केले आहे. म्यानमार मध्ये सेनेला जुंटा म्हटले जाते ते तिथे निर्दयीपणे लोकांना मारत आहेत. म्यानमार मध्ये फेब्रुवारी २०२१ मध्ये सत्तापालट केली होती. त्यानंतर म्यानमार गृहयुद्धाच्या आगीत जळत आहे. ज्यात असंख्य निष्पाप लोक मारले गेले आहेत. सेना आणि सर्वसामान्य लोकांमध्ये संघर्ष सुरू आहे. देशात अनेक विद्रोही गट स्थापित झाले आहेत ज्यांनी सतत सेनेविरुद्ध लढा लढला आहे. लष्कराने नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हल्ले आणि बॉम्बस्फोट करत क्रुरतेच्या सर्व हद्द पार केल्या आहेत.
बीबीसीच्या अहवाला नुसार सांगितले गेले की, म्यानमारमध्ये भूकंपानंतर सेनेने हवाई हल्ले आणि ड्रोन हल्ल्यांना कायम ठेवले. भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या सागाइंग मध्ये एअरस्ट्राईक करण्यात आले. या क्षेत्रात भूकंपाने मोठे नुकसान पोहचवले होते तरीही सैन्याने तेथे हल्ले केले. चाऊंग यू टाऊनशीप पीपल्स डिफेन्स फॉर्सने सांगितले की स्थानिक वेळेनुसार १९.४० वाजता सागाइंन च्या चाउंग यू टाउनशिपने न्वे ख्वे गाववर दोन बॉम्ब टाकले. याशिवाय सेनेने दोन हल्ले हे कायिन राज्याच्या वाह मध्ये केले.
म्यानमारमधील संघर्ष
म्यानमारने १९४८ मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळवले. पण देशात कधीच शांतता नव्हती. म्यानमारने बरीच वर्षे अशांतता आणि लष्करी राजवट पाहिली आहे. २०११ मध्ये म्यानमार लोकशाहीच्या दिशेने जात आहे असे वाटले. कारण चार वर्षांनंतर स्वतंत्र निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीत आंग सान सू की जिंकल्या. पण २०२१ मध्ये लोकशाहीची आशा संपली. जनरल मिन आंग ह्लाइंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार उलथून टाकले. लोकशाही सरकारला सत्तेवरून खाली खेचले. सैन्याने नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सान सू की आणि त्यांच्या सरकारमधील इतर सदस्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर निवडणुकीत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. आंग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पार्टीने ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी विक्रमी विजय मिळवला होता.
या सत्तापालटानंतर मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन सुरू झाले. हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी लष्करी राजवटीचा विरोध केला. नागरिकांनी सरकार परत आणावे, अशी मागणी केली. नागरिक आणि सेना यांच्यातील हिंसा वाढत गेली. सेनेने जमावावर अश्रुधूर आणि रबराच्या गोळ्यांचा वापर केला. मानवाधिकार गटांचे म्हणणे आहे की, या दडपशाहीत शेकडो लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले.
म्यानमारमध्ये मोठा भूकंप आला आहे. देश विद्रोही गटांमुळे विभागला गेला आहे. तरीही सेना हे समजून घेत नाहीये. म्यानमारच्या सैन्याने मृतांची आकडेवारी अचानक वाढवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मृतांची संख्या १००० जास्त झाली आहे आणि २३७६ लोक जखमी झाले आहेत. भूकंपाने सर्वात जास्त मृत्यू मांडले शहरात झाले आहेत. हे शहर भूकंपाच्या केंद्राजवळ आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. भारत सरकारने म्यानमारला मदतीसाठी टीम पाठवली आहे. पण लोकशाही देशांनी म्यानमारच्या सैन्याशी बोलणे आवश्यक आहे.
Related
Articles
अनधिकृत फलकामुळे वडगावशेरी मतदारसंघाचे विद्रुपीकरण
01 Apr 2025
राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवा होणार सुरू
02 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
नवसर्जनाचे स्वागत करु या...
30 Mar 2025
आरक्षणाचे राजकारण
31 Mar 2025
राज्यात चार दिवस वादळी वार्यासह पाऊस
02 Apr 2025
अनधिकृत फलकामुळे वडगावशेरी मतदारसंघाचे विद्रुपीकरण
01 Apr 2025
राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवा होणार सुरू
02 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
नवसर्जनाचे स्वागत करु या...
30 Mar 2025
आरक्षणाचे राजकारण
31 Mar 2025
राज्यात चार दिवस वादळी वार्यासह पाऊस
02 Apr 2025
अनधिकृत फलकामुळे वडगावशेरी मतदारसंघाचे विद्रुपीकरण
01 Apr 2025
राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवा होणार सुरू
02 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
नवसर्जनाचे स्वागत करु या...
30 Mar 2025
आरक्षणाचे राजकारण
31 Mar 2025
राज्यात चार दिवस वादळी वार्यासह पाऊस
02 Apr 2025
अनधिकृत फलकामुळे वडगावशेरी मतदारसंघाचे विद्रुपीकरण
01 Apr 2025
राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवा होणार सुरू
02 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
नवसर्जनाचे स्वागत करु या...
30 Mar 2025
आरक्षणाचे राजकारण
31 Mar 2025
राज्यात चार दिवस वादळी वार्यासह पाऊस
02 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात